देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी
By admin | Published: September 12, 2016 02:07 AM2016-09-12T02:07:25+5:302016-09-12T02:07:25+5:30
गणेशोत्सवानिमित्त शहरातील अनेक मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सायंकाळपासूनच पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी, काळभोरनगर येथे गर्दी उसळली होती.
पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त शहरातील अनेक मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सायंकाळपासूनच पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी, काळभोरनगर येथे गर्दी उसळली होती.
यंदा सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. शहरातील थेरगाव, वाकड, हिंजवडी या ठिकाणच्या मंडळांचे देखावे पाहण्यासाठीसुद्धा रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होती. मुंबई-पुणे महामार्गावरील बहुतांश मंडळांनी विविध आकर्षक देखावे सादर केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हे देखावे लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांना खिळवून ठेवत आहेत. देखाव्यासोबतच काही मंडळांनी जिवंत देखावे सादर केले असून हे देखावे गर्दी खेचत आहेत. (प्रतिनिधी)