पिंपरी चिंचवड शहरात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी; महापालिकेकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 08:19 PM2020-12-22T20:19:01+5:302020-12-22T20:19:26+5:30
नवीन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भोसरीत स्वतंत्र रुग्णालय
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यु (संचारबंदी) लागू केली आहे. ही संचारबंदी जानेवारीपर्यंत असेल. नवीन कोरोना विषाणूचा शहरात प्रसार होवू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
.................
नवीन उत्परिवर्तन करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परदेशी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी भोसरीतील महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. तसेच वाकड येथील दोन हॉटेलही प्रवाशांच्या कॉरंटाईनसाठी सज्ज ठेवली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी महापालिकेने दक्षता घेण्यात येणार आहे. लंडनवरून येणाºया प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहे. हवाई प्रवाशांना शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची नियुक्ती केली आहे. नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी भोसरीत नवीन रुग्णालय सज्ज ठेवले आहे.
.................................
परदेशातून येणाऱ्या हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चानेसात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. प्रवासी येताना लक्षणे आढळून आल्यास त्यास पुढील उपचारासाठी थेट भोसरीतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जुन्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नवीन विषाणूच्या रुग्णांना ठेवले जाणार नाही.
अजित पवार, अतिरिक्त आयुक्त
..........................
१८ रुग्णांना करणार स्थलांतरित
भोसरीतील रुग्णालयात जुन्या कोरोनाच्या १८ रुग्ण आहेत. त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहे. तसेच परदेशातून येणाºया प्रवाशांचे आगमान झाल्या-झाल्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार नाही. पाचव्या ते सातव्या दिवसादरम्यान विलगीकरण केलेल्या प्रवाशांना स्व:खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. चाचणी निगेटीव्ह आढळल्यास प्रवाशाला पाच ते सात दिवसांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षातून सोडण्यात येईल. या प्रवाशास सात दिवसांचे अनिवार्य होम क्वारंटईन असेल. आरटीपीसीआरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. परंतु, लक्षणे नसल्यास त्याच हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येईल. त्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत असेल. हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना शुल्क आकारण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. .
............
परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल मार्फत करण्यात येईल. सर्व प्रवाशांचे पासपोर्ट पासपोर्ट जमा केले जातील. विलगीकरण संपल्यानंतर ते परत केले जाणार आहेत. प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी खासगी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येईल. त्याबाबतचे शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे.
- श्रावण हर्डीकर आयुक्त