आॅनलाइनद्वारे लाखोंचा गंडा, बावधनमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:58 AM2018-09-29T01:58:27+5:302018-09-29T01:58:39+5:30
‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी - ‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर जनार्दन बकरे (वय ४९, रा. आदित्य शगुन सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. रोहित उचिल, महेश कुमार आणि असित मल्लिक (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बकरे बावधन येथे क्रेनचा व्यवसाय करतात. त्यांना मोटारकार घ्यायची होती. त्याबाबत त्यांनी ओएलएक्सवर चौकशी केली. त्या वेळी त्यांना महेश कुमार आणि डॉ. रोहित उचिल यांना त्यांची मोटारकार (एम एच ४६ / बी ए ०५२७) विकायची असल्याची जाहिरात दिसली. त्यांनी त्याबाबत माहिती काढून महेश आणि रोहित यांच्याशी संपर्क केला.
बकरे यांनी संपूर्ण रक्कम बँक खात्यावर भरली, मात्र आरोपींनी बकरे यांना मोटारकार दिली नाही. यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्यांनी तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.