दिवसाआड पाणीपुरवठा मंगळवारपासून

By Admin | Published: May 1, 2017 02:56 AM2017-05-01T02:56:14+5:302017-05-01T02:56:14+5:30

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. आज रोजी पवना

Daily water supply from Tuesday | दिवसाआड पाणीपुरवठा मंगळवारपासून

दिवसाआड पाणीपुरवठा मंगळवारपासून

Next

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. आज रोजी पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २६ टक्के पाणीसाठा होता. महाराष्ट्र दिनानंतर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
यंदाचा पाऊस सरासरीइतका होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला; तरी वाढलेली लोकसंख्या व वाढलेला पाणी उपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक आहे. तसेच बचतीसाठी व अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सर्व पदाधिकारी, गटनेते व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.
बैठकीनुसार २ मेपासून पाणीपुरवठ्यामध्ये २५ टक्के कपात करण्यात येत आहे. पर्यायाने शहरास दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाऊस लांबल्यास आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीवगळता टॅँकरने पाणीपुरवठा बंद राहील. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)

नितीन काळजे : पाण्याचा अपव्यय टाळा
उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने ज्या भागांना २ मे २०१७ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे व ज्या भागांना ३ मे २०१७ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या तारखांनंतर त्या त्या भागांना एक दिवस सोडून म्हणजेच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. ‘‘सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महानगरपालिकेमार्फत वितरित होणारे पाणी जपून वापरावे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.

Web Title: Daily water supply from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.