भंगार मालाने ‘इंद्रायणी’ची गटारगंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:26 AM2018-11-14T00:26:33+5:302018-11-14T00:26:56+5:30

चिखली, कुदळवाडीतील गोदामे नदीकाठी : प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता

Dangaranganga of 'Indrayani' by the scrap material | भंगार मालाने ‘इंद्रायणी’ची गटारगंगा

भंगार मालाने ‘इंद्रायणी’ची गटारगंगा

Next

संजय माने

पिंपरी : चिखलीतील भंगारमालाची गोदामे इंद्रायणी नदीपात्र दूषित करण्यास कारणीभूत ठरू लागली आहेत. चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाची गोदामे नदीकाठी असल्याने भंगारमाल, त्यापासून होणारा कचरा, रासायनिक घटक नदीपात्रात टाकले जातात. भंगार मालाच्या गोदामांच्या मागील बाजूस कोणी जात नसल्याने हा प्रकार निदर्शनास येत नाही. परंतु, भंगारमालाच्या कच-याने इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली असून, प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

चिखली, कुदळवाडीपासून अवघ्या काही अंतरावर संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधिस्थळ आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. आळंदीपर्यंत वाहत जाणारे इंद्रायणी नदीचे पाणी चिखली ते आळंदी या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात कोठेही रुग्णालयीन कचरा टाकल्याचे दिसून येत नाही. या परिसरात मात्र नदीकाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णालयीन कचरा टाकला असल्याचे चित्र दिसून येते. डॉक्टरांनी वापरलेल्या सिरिंज, रुग्णांसाठी वापरलेला कापूस, तसेच कालबाह्य झालेली औषधे सर्रासपणे या भागात टाकल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस जलप्रदूषण वाढत आहे. उपाययोजनांकडे दुर्लक्ष शहराच्या मध्य भागातून वाहणारी पवनाही प्रदूषित झाली आहे. औद्योगिक वापरातील मैलासांडपाणी, तसेच घरगुती वापरातील सांडपाणी, नाले, गटारे पवना नदीपात्रात मिसळले जात असल्याने पवनेला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पवनेच्या प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिका स्तरावर काही तरी उपाययोजना केल्याचे दिसून येते. इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत.

हद्दीसाठी रखडल्या उपाययोजना
पवना नदी शहराच्या मध्यभागतून वाहत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका नदीसुधार प्रकल्पाच्या माध्यमातून काही ना काही उपाययोजना करते. लोणावळ्यातून उगम पावणाऱ्या इंद्रायणी नदीचा मार्ग मात्र तळेगाव, वडगाव, देहूगाव, तसेच चिखलीमार्गे आळंदी असा आहे. तळेगाव नगर परिषद,देहू ग्रामपंचायत, तसेच आळंदी नगर परिषद अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून वाहणाºया इंद्रायणीच्या प्रदूषण नियंत्रणाबाबत नेमक्या उपाययोजना कोणी करायच्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संस्था त्यांच्या हद्दीपुरता विचार करीत असल्याने संपूर्ण इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत उदासीनता दिसून येते.

पवित्र नदीचे वाढले प्रदूषण
४श्रीक्षेत्र देहूतून चिखलीमार्गे बाहेरील बाजूने आळंदीकडे वाहत जाणाºया इंद्रायणी नदीचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कार्तिकी एकादशी, संजीवन समाधी सोहळा, आषाढी वारी या कालावधीत महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून दर्शनासाठी भाविक आळंदीत दाखल होतात. पवित्र इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून दर्शनाला जाण्याचा त्यांचा मनोदय असतो. मात्र इंद्रायणीचे पात्र दूषित पाण्याने भरले असल्याने भाविकांना इंद्रायणीत स्नान करण्याची इच्छा उरत नाही.

इंद्रायणी नदीपात्रात भंगार माल, तसेच रासायनिक घटक टाकणाºया भंगारमाल व्यावसायिकांची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली आहे. अनधिकृतरीत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये चिखली, कुदळवाडी येथे भंगारमालाची गोदामे आहेत. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने योग्य ती कारवाई करण्याबाबत कळविले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागालासुद्धा कळविण्यात आले आहे. भंगारमालाच्या अनधिकृत शेडवर कारवाई करावी, असे पत्र अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहे. कारवाई होणे अपेक्षित आहे. - संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता
पर्यावरण अभियांत्रिकी विभाग
 

Web Title: Dangaranganga of 'Indrayani' by the scrap material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.