विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांची धोकादायक हाताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 04:18 AM2018-10-13T04:18:18+5:302018-10-13T04:18:49+5:30
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड : आरोग्य विभागाकडून तपासणी; स्वच्छतेची काळजी न घेतल्याने बजावली नोटीस
खडकी : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खडकी बाजारातील मिठाईची दुकाने, हॉटेल आणि बेकरी यांची खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. यात काही व्यावसायिकांनी स्वच्छतेची काळजी न घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा व्यावसायिकांना बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने अन्नपदार्थ विक्रीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. अन्न योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येत आहे. खडकीतील हॉटेल, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि स्टेशन हेल्थ आॅर्गनायझेशन यांच्या वतीने खडकी व आसपासच्या परिसरातील खाद्यपदार्थ, मिष्ठान्न विक्री करणारी दुकाने, हॉटेल, बेकऱ्या आदी ठिकाणी जाऊन आरोग्य विभागामार्फत पाहणी केली जात आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये खडकीतील बेंगलोर बेकरी येथे जमिनीवर, उघड्यावर खाद्यपदार्थ ठेवल्यामुळे व मेहता टॉवर आकाशदीप सोसायटी येथील काही सदनिकाधारकांना गॅलरीमध्ये झाडांच्या कुंड्या लावल्यामुळेही नोटीस बजाविण्यात आल्या.
स्टेशन हेल्थ आॅर्गनायझेशनच्या लेफ्टनंट कर्नल सुखमीत मिनाझ, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक, आरोग्य निरीक्षक शिरीष पत्की आणि कर्मचाºयांचा या मोहिमेत सहभाग होता. यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एकाच दिवसात दहा व्यावसायिकांना नोटीस
४ योग्य पध्दतीने हाताळणी न करता खाद्यपदार्थ जमीनीवर ठेवल्याचे आढळल्याने बँगलोर बेकरीसह सात दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली. दुकानात कचरा व घाण आढल्यलाामुळे तीन दुकानदारांनाही नोटीस देण्यात आल्या. खाद्यपदार्थांची हाताळणी योग्य पध्दतीने करण्यात यावी, त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. पुन्हा होणाऱ्या तपासणीत असाच प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी सूचना या नोटीसीतून देण्यात आली आहे.
गॅलरीतील कुंड्या काढण्याच्या सूचना
४घराच्या गॅलरीमध्ये कुंड्या ठेवल्याचेही या पाहणीदरम्यान अधकिºयांच्या निदर्शनास आले. या कुंड्यांतील पाणी आणि माती तेथून ये-जा करणाºया नागरिकांच्या अंगावर पडत असल्याचे या वेळी दिसून आले. त्यामुळे या कुंड्या काढून घेण्यात याव्यात, अशी सूचना करीत आठ सदानिकाधारकांनाही या वेळी नोटीस देण्यात आल्या.
ग्राहकांनी सजग राहण्याची गरज
४खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहावे. खाण्यायोग्यच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. खाद्यपदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा काय कसे, याबाबत पडताळणी करावी. त्याबाबत काही शंका असल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा किंवा बोर्डाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
स्वच्छता पाळण्याचे आवाहन
४ खाद्यपदार्थ विके्रत्यांनीही भेसळ करू नये. जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही. खाद्यपदार्थनिर्मिती आणि विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता पाळावी. खाद्यपदार्थांची हाताळणीही योग्य प्रकारे करावी. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे.