भयंकर ! कबुतरे उडविल्याच्या रागातून सावत्र भावावर कुऱ्हाडीने सपासप वार; चिखलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:47 PM2021-02-06T15:47:57+5:302021-02-06T15:48:24+5:30
तुझ्या लहान भावाला मस्ती आली आहे म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली.
पिंपरी : कबुतरे उडविल्याच्या रागातून सावत्र भावावर कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. या प्रकरणी सावत्र आई आणि भावावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सिद्धेश्वर कांबळे, माया कांबळे (दोघे रा. जाधववाडी चिखली ) आणि अनोळखी चार ते पाच इसमां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर दयानंद कांबळे (वय २८, रा. बोल्हाईमळा कॉलनी, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी गुरुवारी (दि. ४) रात्री अकरा वाजता जेवण करुन घराबाहेर उभे होते. त्यावेळी सावत्र आई आणि भाऊ त्यांच्या घरासमोर आले. फिर्यादीच्या लहान भावाने कबुतरे उडविल्याचा जाब त्यांना विचारला. तुझ्या लहान भावाला मस्ती आली आहे म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर सावत्र आईने फिर्यादींनाच धरले. सिद्धेश्वरला त्याला मारण्यास सांगितले. आरोपी सिद्धेश्वर याने कुऱ्हाडीने डोक्यावर, पाठीवर, डाव्या हाताच्या मनगटावर, पायाची नडगी, हाताची बोटे यावर सपासप वार केले. सोबतच्या इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.