शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:12 PM2019-06-17T15:12:58+5:302019-06-17T15:18:52+5:30

पण या गावाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय पोट्ट्यांचा पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..

Dangerous journey of first day school with risky boat | शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

googlenewsNext
ठळक मुद्देइंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा

वडगाव मावळ : दोन गावांमधील '' त्यांचा '' शाळेचा, व्यवहाराचा असा प्रवास तीन पिढ्यांपासून आहे. पण या गावांचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय '' पोट्टे '' पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..यंदाही तसंच झालं...शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निकामी होडीतून जीवघेणा प्रवास करत सोमवारी शाळा गाठली. मावळ तालुक्यातील नाणोली व वराळे गावातील शेतकरी, महिला व विद्यार्थांची ही कहाणी.. इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी शासनाला जाग येईना तर नवीन होडी देण्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती वर्षांनुवर्षे येथे कायम आहे. 
इंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या दीड हजार आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत  जाण्यासाठी होडीचा वापर करतात. गेल्या दोन वर्षांपासून या होडीचा अवस्था बिकट झाली आहे. तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे  होडीत पाणी येते. ते पाणी डब्याने बाहेर काढावे लागते. येथील शेतक-यांच्या जमिनी नाणोली चाकण येथे असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

मानधनाशिवाय नावाड्यांची तिसरी पिढी..

गावकऱ्यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटुंबीय उदानिर्वाह करत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरुवातीला दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यवसाय  सुरू केला.त्यानंतर मुलगा बळीराम आंणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थांची सेवा  आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतू सध्या महाखाईचे दिवस आहेत.त्यामुळे शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन द्यावे अशी मागणी बिबाबाई यांनी केली आहे. फुटलेल्या  होडीचा पत्रा पायाला  लागल्याने बिबाबाई जखमी झाली आहे. तरी देखील नाव ओढण्याचे काम करीत आहे. 

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता....

पावसाळ्यात अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो. आपत्कालीन व आणिबाणीच्या  परिस्थितीत प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पयार्यी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांनसाठी तातडीने  पर्याय व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. 

 

नविन पुलाचे कीती नारळ फुटणार ; मोठी दुर्घटना घडल्यावर शासनाला जाग येणार का ?

वराळे--नाणोली येथील इंद्राई नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी  ५० वषार्पूर्वी केली होती.१९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु   अध्याप पूल झाला नाही. निकामी झालेली होडी नविन मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे पाठ पुरावाही केला या बाबत गेल्यावर्षी १६ जूनला ''लोकमत'' मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर  शासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे. नविन होडी मिळावी  व पूलाचे काम सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरूण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंढे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. 
 

Web Title: Dangerous journey of first day school with risky boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.