विधीमंडळातील ठराव पवित्र असतो: देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 11:01 PM2023-02-23T23:01:33+5:302023-02-23T23:02:17+5:30
झिझिया करातून मुक्तता
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी - मुघलांच्या काळात जसा झिझिया कर होता तसा शास्ती कर पिंपरी चिंचवड शहरामध्ये होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तो लावला. भाजपचे सरकार आल्यानंतर 1000 चौरस फूट बांधकामांचा शास्तीकर रद्द केला. आता आम्ही सरसकट माफी केली. त्याचा शासन आदेश लवकरच निघेल. विधीमंडळात झालेला निर्णय पवित्र असतो. आचारसंहिता संपल्यानंतर हा शासन आदेश निघेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रांतध्यक्षा चित्रा वाघ, खासदार धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, उमा खापरे, प्रा. राम शिंदे आदि उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, चिंचवडची ही निवडणूक अचानक आली. आपल्याला कल्पना न्हवती. मात्र लक्ष्मण जगताप यांचे कार्य पुढे नेले पाहिजे. त्यासाठी अश्विनी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. शहरातील नागरिकांसाठी सरसकट शास्तीकर माफीचा निर्णय झाला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी गरज आहे. 250 एमएलडी पाणी आंद्रा धरणातून आणले आहे ते पुढील दोन महिन्यात शहराला मिळेल. पंतप्रधान मोदी करोडो रुपये शहरीकरणासाठी देत आहेत. कारण शहर संधी निर्माण करतात. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शहरे बकाल केली. मात्र मोदी आता परिवर्तन करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"