Pune Helicopter Crash: अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह उचलून न्यावे लागले; ‘पीएमआरडीए’च्या पथकाकडून बावधनला मदतकार्य

By नारायण बडगुजर | Published: October 2, 2024 06:05 PM2024-10-02T18:05:25+5:302024-10-02T18:06:17+5:30

जवानांनी स्ट्रेचरचा वापर करीत मृतदेह अर्धा किलोमीटर बाहेर आणत पोलिसांच्या ताब्यात दिले

Dead bodies had to be carried for half a kilometer; Relief work to Bavdhan by the team of 'PMRDA' | Pune Helicopter Crash: अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह उचलून न्यावे लागले; ‘पीएमआरडीए’च्या पथकाकडून बावधनला मदतकार्य

Pune Helicopter Crash: अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह उचलून न्यावे लागले; ‘पीएमआरडीए’च्या पथकाकडून बावधनला मदतकार्य

पिंपरी : बावधन, के के कन्स्ट्रक्शन टेकडी भागात बुधवारी (दि.२) सकाळी साडेआठला अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला हेलिकॉप्टर कोसळल्याची वर्दी नागरिक, शासकीय रुग्णवाहिका १०८ यांच्याकडून मिळाली. यानंतर तातडीने दलाकडून वारजे, औंध, कोथरुड येथील अग्निशमन वाहने, मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन दलाकडून एक फायरगाडी एक रेस्क्यु व्हॅन अशा एकुण चार अग्निशमन बंब, दोन अद्यायवत रेस्क्यु व्हॅन रवाना केल्या होत्या.

पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की, हेलिकॉप्टर भस्मसात झाले असून काही प्रमाणात आग लागलेली आहे. त्यामुळे प्रथम हेलिकॉप्टरमध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर तातडीने जवळच काही अंतरावर हेलिकॉप्टरमधील व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे दिसले. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिस व डॉक्टरांनी सांगितले. जवानांनी स्ट्रेचरचा वापर करीत मृतदेह अर्धा किलोमीटर बाहेर आणत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले.

घटनास्थळी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, सुजित पाटील यांच्यासह ३० जवान कार्यरत होते. यासह पोलिस विभाग, शासकीय रुग्णवाहिका १०८ पथक, प्रांताधिकारी, एमआयडीसी हिंजवाडी अग्निशमन दल आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक आदी विभागांकडून मदतकार्य करण्यासाठी उपस्थित होते.

Web Title: Dead bodies had to be carried for half a kilometer; Relief work to Bavdhan by the team of 'PMRDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.