दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा पवना नदीत आढळला मृतदेह; काळेवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 20:58 IST2021-07-26T20:58:00+5:302021-07-26T20:58:46+5:30
दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती घरातून अचानक बेपत्ता झाला होता....

दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा पवना नदीत आढळला मृतदेह; काळेवाडीतील घटना
पिंपरी : दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या इसमाचा पवना नदी पात्रात मृतदेह आढळला. काळेवाडी येथे सोमवारी (दि. २६) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दीपक हरिचंद्र खंडारे (वय ३२, रा. भाटनगर, पिंपरी), असे मृत इसमाचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडारे हा दोन दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी काळेवाडी येथील नदी पात्रात मृतदेह आढळून आला. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक खंडारे याचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.