हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: March 17, 2023 02:32 PM2023-03-17T14:32:31+5:302023-03-17T14:56:44+5:30

पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली

Deadline for filling RTE forms extended Relief for parents | हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

googlenewsNext

पिंपरी : आरटीई खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी शुक्रवार १७ मार्च दुपारपर्यंत पालकांकडून एक हजार ६२२ अर्ज करण्यात आले. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रिया सुरू असून १७ मार्चला रात्री बारापर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया एक मार्चपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत परिपूर्ण अर्ज करावा, पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पालकांसाठी मदत केंद्राची स्थापना केली आहे. मात्र, सलग आरटीईचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता.

सर्व्हर हॅग...

आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्ज करण्याची गती वाढतच असून सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन संकेतस्थळ बंद पडत आहे. वारंवार सर्व्हर हँग होत आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे

शहरात ४ हजार ३०० जागा...

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. पाठपुरावा केल्यानंतर नोंदणी प्रक्रियेला वेग आला. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत १७२ शाळांनी नोंदणी केली. संबंधित शाळांमधील ४ हजार ३०० जागा आरटीईअंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवल्या आहेत.

Web Title: Deadline for filling RTE forms extended Relief for parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.