निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:54 AM2018-05-10T02:54:51+5:302018-05-10T02:54:51+5:30
निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच नायजेरीयन आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. फॉर्चुन ओग्बेहासे असे मृत आरोपीचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात तो २० जुलै २०१७ पासून येरवडा कारागृहात होता.
पुणे : निर्दोष मुक्ततेच्या दिवशीच नायजेरीयन आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. फॉर्चुन ओग्बेहासे असे मृत आरोपीचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात तो २० जुलै २०१७ पासून येरवडा कारागृहात होता.
न्यायबंदी असलेला फॉर्चुन हा मेनिनजायटीस आजाराने ग्रस्त होता. हा आजार मेंदू आणि पाठीच्या कण्याशी संबंधित आहे. त्याला २४ एप्रिल २०१८ रोजी कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. त्याची या खटल्यासह इतर एका गुन्ह्यातून प्रथम वर्ग खडकी न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर, हिंजवडी येथील एका गुन्ह्यात जामिनावर मुक्ततेचे आदेश देण्यात आले होते. त्याची ४ मे २०१८ रोजी खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.