वराळे येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू
By विश्वास मोरे | Published: December 10, 2024 06:58 PM2024-12-10T18:58:12+5:302024-12-10T18:58:12+5:30
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत वारे यांनी तपास करीत आहेत.
तळेगाव दाभाडे : वराळे (ता.मावळ) येथील आंबीरोडजवळील इंद्रायणी नदीत बुडून सुंदराम सिंग (वय-१४ वर्ष, रा.आंबी) या युवकाचा मृतदेह आढळून आला. मित्रांबरोबर फिरायला जातो, असे सांगून सिंग हे रविवारी घराबाहेर पडले होते. त्यानंतर मृतदेह सापडला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीमध्ये सुंदराम सिंग हे पोहण्यास गेला होता. मात्र, पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याचा मित्र गाजावाजा न करता भितीपोटी पळून गेला.
दरम्यान श्रीनिवास तळेगावकर यांनी लहान मुलाचे कपडे नदीकाठी असल्याचे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांना सांगितले. यावरुन मृतदेह शोध मोहीम राबविली. सोमवारी दुपारी सिंग यांचा मृतदेह सापडला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, प्रशांत भालेकर, शुभम काकडे, राजू सय्यद यांनी मदत कार्य केले. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत वारे यांनी तपास करीत आहेत.