कामशेत येथे क्रेनवरील बार अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:36 PM2018-11-17T12:36:25+5:302018-11-17T12:37:14+5:30
खाजगी कंपनीच्या शेड उभारणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला.
कामशेत : कामशेत शहराजवळील मौजे चिखलसे गावाच्या परिसरात एका खाजगी कंपनीच्या शेड उभारणीचे काम सुरू असताना क्रेनवरील अवजड बार अंगावर पडल्याने अजय लिलमोहन कुजुर ( रा. बंधूनासा पो. रायेकरा, पश्चिमी सिहभूम, झारखंड ) यांचा मृत्यू झाला.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. १६ ) सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास चिखलसे गावात शुभ कंपोझित कंपनीच्या नवीन शेडच्या उभारणी काम चार दिवसांपासून सुरू असताना अजय २५ फूट उंचीवर शेडच्या लेव्हलिंगचे काम करत होता. यावेळी क्रेनने उचललेला स्पेडर बार अचानक त्याच्या अंगावर पडल्याने अजय निपचित पडला. त्याच्या साथीदारांनी त्याला कामशेत येथील खाजगी दवाखान्यात तातडीने दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस हवालदार महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.