तळवडे आग दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 16, 2023 12:17 PM2023-12-16T12:17:22+5:302023-12-16T12:18:03+5:30
रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन...
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण सुमन गोधडे (वय ४० वर्षे) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले.
तळवडे येथील एका कारखान्यामध्ये ८ डिसेंबरला घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे दि.१४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले.
आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १२ इतकी झाली आहे. या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.