पेटवलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारदरम्यान मृत्यू
By admin | Published: March 9, 2017 04:08 PM2017-03-09T16:08:15+5:302017-03-09T16:08:15+5:30
पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला
Next
>नातेवाईकच संशयित आरोपी, गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि, ९ - पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या उद्धव आसाराम उनवणे (वय ६५, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) या ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नी, जावयासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकवरुन पैसे घेऊन उनवणे बुधवारी वल्लभनगर बस स्थानकात आले होते. उद्धव उनवणे (वय ६५) हे मूळचे नाशिकचे परंतू आळंदीत राहत होते. आळंदीतील घराचे भाडे थकले होते. ही भाड्याची रक्कम घेऊन ते नाशिकहून वल्लनभनगरला आले. वल्लभनगर स्थानकातून ते कासारवाडी नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी तिघांनी त्यांचा पाठलाग केला. तुम्ही उनवणे आहात काय ? अशी विचारणा केली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील २० हजार रूपयाची रोकड काढून घेतली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. त्यामध्ये ते गंभीररित्या भाजले. पेटवून दिल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले होते. रस्त्याने जाणाºया काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई केली. आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा अंदाज बांधत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू वयोवृद्ध गृहस्थ गंभीर भाजला असल्याने फिर्याद दाखल करावी. अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. या प्रकरणी फिर्याद दाखल करताना पत्नी सुमन,जावई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्याहसह अन्य तिघांविरोधात संशय व्यकत केला होता. भाजलेल्या उनवणे यांना वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.