लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:43 PM2018-06-28T14:43:58+5:302018-06-28T14:47:31+5:30

कचरावेचकांच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाणी साठवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या खड्डयात बुडून मृत्यु झाला.

death of two minor children at Lonavala Municipal garbage depot | लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यु

लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यु

Next
ठळक मुद्देएकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकाना यश आले असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कचरावेचकांच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाणी साठवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या खड्डयात बुडून मृत्यु झाला. यापैकी एक मृतदेह दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. 
सोनु रफिक शेख (वय १४ रा. वाकसईचाळ, लोणावळा) व अस्लम इस्माईल मुजावर (वय १५ रा. पुणे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. ते दोघेही मावस भाऊ आहेत. यापैकी सोनु याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकाना यश आले असून अस्लम इस्माईल मुजावर याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे स्वंयसेवक आकडे व ट्युबच्या सहाय्याने सदरचा मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. सोनू याचे वडील व कुटुंबीय हे लोणावळा शहरातून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे काम करतात. शेख कुटुंबीय हे मूळचे लातूरचे असून मागील अनेक वर्षांपासून ते वाकसई चाळ येथे राहत होते.

Web Title: death of two minor children at Lonavala Municipal garbage depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.