‘पवने’त बुडून तरुणाचा मृत्यू
By admin | Published: May 6, 2017 02:21 AM2017-05-06T02:21:01+5:302017-05-06T02:21:01+5:30
मित्रांबरोबर अंघोळीसाठी गेलेल्या मनोज शेषण्णा नायडू या ३१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : मित्रांबरोबर अंघोळीसाठी गेलेल्या मनोज शेषण्णा नायडू या ३१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या मित्रांसह पवना नदीवरील केजुबाई धरणावर गेला होता. तो पाण्यात बुडाल्याने त्याच्या मित्रांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
चिंचवडेनगरमध्ये राहणाऱ्या मनोजला पोहता येत नसल्याने तो धरणाच्या बाजूला असणाऱ्या गुढगाभर पाण्यात अंघोळ करीत होता. काही वेळानंतर मनोज दिसत नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला़ त्या वेळी मनोज पाण्यात पडून असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मनोज गेली दहा वर्षे वाहने दुरुस्तीचे काम करीत होता़ एक वर्षांपूर्वीच त्याने स्वत:चे दुकान टाकले होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तो घराचा आधार होता. आई, वडील,भाऊ व वाहिनींसह तो रहात होता. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.