संरक्षण प्रश्नांसंदर्भात अधिवेशनानंतर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:48 AM2017-08-04T02:48:38+5:302017-08-04T02:48:38+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ गुरुवारी दिल्लीला गेले होते.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ गुरुवारी दिल्लीला गेले होते. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतली. संरक्षण विभागाच्या सचिवाला प्रश्नांची माहिती देण्यात आली असून, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
महापालिका हद्दीतील संरक्षण विभागाचे अनेक प्रश्न आहेत. तळवडे, रुपीनगर, चिखली हा पट्टा रेडझोनच्या हद्दीत येतो. बोपखेल आणि पिंपळे सौदागर येथील रक्षक चौकातील रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे.
संरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.