दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:33 AM2017-12-14T05:33:11+5:302017-12-14T05:33:21+5:30

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणा-या विशेष कार्य अधिका-याने दमबाजी व दादागिरी केल्याचा विषय आजच्या स्थायी समितीसमोर गाजला. बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे स्थायी समितीने सांगितले.

Decision to send 'Permanent' officials back to government service | दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव

दादागिरी खपवून घेणार नाही,‘स्थायी’चा अधिका-यांना इशारा, शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा ठराव

Next

पिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणा-या विशेष कार्य अधिका-याने दमबाजी व दादागिरी केल्याचा विषय आजच्या स्थायी समितीसमोर गाजला. बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे स्थायी समितीने सांगितले. ‘ज्या अधिका-यामुळे आपल्याला मान्यता मिळण्यास उशीर झाला. त्यांची महापालिकेला आवश्यकता नाही. त्यांच्यामुळे वायसीएममधील वातावरण दूषित होत असेल, तर अशा अधिका-याला शासनसेवेत परत पाठवा, या विषयीचा प्रस्ताव पुढील सभेत समितीसमोर ठेवण्यात यावा, अशा सूचना स्थायी समितीने प्रशासनास दिल्या.
कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकाºयाने ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईन. माझ्या नादाला लागाल, तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली असल्याचे पत्र वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. तसेच विशेष कार्य अधिकाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असून, त्यांची पालिकेतील सेवा
समाप्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर वायसीएममधील कर्मचाºयांनी या प्रकाराचा निषेध केला होता.
या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी अधिकाºयांच्या दमबाजीविषयी नाराजी व्यक्त केली.
आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘उपद्रवी माणसांची आपल्या महापालिकेस गरज नाही. अधिकाºयांना दमबाजी करणे योग्य नाही.’’ शरद मिसाळ म्हणाले, ‘‘बघून घेईन, पाहून घेईन, असे म्हणणे योग्य नाही. स्थायी समितीने ही बाब गांभीर्याने घ्यावी.’’

- प्रशासनाकडून डॉ. पंडित यांची माहिती मागवून घेतली. त्यानंतर सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि डॉ. अनिल रॉय यांनी पंडित हे मानधन तत्त्वावर आहेत. त्यांची मुदत संपली आहे, असे सांगितले आहे. पंडित यांची आवश्यकता नसल्याचेही प्रशासनाने या वेळी सांगितले. याविषयी पुढील सभेत कारवाईचा प्रस्ताव ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली.

Web Title: Decision to send 'Permanent' officials back to government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.