पिंपरी शहरातील व्यायामशाळांना सेवा शुल्क न देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 03:54 PM2019-09-18T15:54:07+5:302019-09-18T15:55:08+5:30
संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय
पिंपरी: शहरातील विविध भागांतील ८२ व्यायामशाळा आहेत. त्या स्थानिक मंडळांना चालविण्यासाठी दिला जात असून, त्यापोटी पालिका दरमहा दोनहजार रुपये सेवाशुल्क देते. मात्र, संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने सभेत घेतला आहे,
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष तुषार हिंगे होते. सदस्य विकास डोळस, बाबा त्रिभुवन, सागर गवळी, राजू मिसाळ, अपर्णा डोके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
हिंगे यांनी म्हणाले, पालिकेच्या शहरात एकूण ८२ व्यायामशाळा आहे. त्या सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठान आणि संस्थांना दरमहा दोन हजार रुपये सेवाशुल्क तत्वावर देण्यात येतात. अनेक मंडळे व संस्था व्यायामशाळा व्यवस्थितपणे चालवित नाहीत. काही व्यायामशाळा बंदच असतात.अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य चोरीला गेले आहे. व्यायामशाळाची दुरवस्था झाली आहे. संबंधितांकडून वीजेचे बिल दरमहा भरले जात नाही.या प्रकाराच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन क्रीडा समितीने त्या मंडळांना दरमहा सेवाशुल्क देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीस लाख रूपयांची बचत होणार आहे.ह्णह्ण
क्रीडा स्थापत्य विभाग सुरू होणार
पालिकेत झोनिपु, उद्यान, बीआरटीएस अशा विभागासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग आहेत. मात्र, क्रीडा विभागासाठी स्थापत्य विभाग नसल्याने क्रीडा विभागाची कुंचबणा होत आहे. क्रीडा स्थापत्य विभाग स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
...........................
पीपीपी तत्वावर उद्याने विकसित करणार
महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. त्याप्रमाणे क्रीडा समितीनेही त्यास मान्यता दिली आहे. शहरातील नागरिकांना विविध खेळांसाठी सरावासाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणून पीपीपी तत्वावर प्रायोजिक तत्वावर छोटी-छोटी मैदाने विकसित केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराजवळ मैदान उपलब्ध होणार आहे. तसेच, पालिकेस भाडे मिळणार आहे. हे मैदान पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि पालिका कर्मचाºयांना मोफत असणार आहेत.