मुख्यमंत्र्यांमुळे रखडला जाहीरनामा
By admin | Published: February 17, 2017 04:58 AM2017-02-17T04:58:30+5:302017-02-17T04:58:30+5:30
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांनी आपले निवडणुकीचे जाहीरनामे प्रकाशित केले आणि जनतेसमोर जाताना पक्षाची
पिंपरी : काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांनी आपले निवडणुकीचे जाहीरनामे प्रकाशित केले आणि जनतेसमोर जाताना पक्षाची भूमिका विशद केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित करण्याचा नेत्यांचा अट्टहास असल्याने त्याच्या प्रकाशनास विलंब झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच दिवसांत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मात्र, अजूनही भाजपाने जाहीरनामा प्रकाशित केला नाही. याबाबत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘भाजपाचा पिंपरी-चिंचवडसाठीचा जाहीरनामा तयार झाला आहे. मात्र, प्रकाशित करण्यासाठी उशीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करायचे असे शहरातील प्रमुख नेत्यांचे मत होते. मात्र त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी दोन दिवस उशीर लागला. शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तो प्रकाशित होणार आहे.’’(प्रतिनिधी)