देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : विषय समिती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:00 AM2018-12-29T01:00:16+5:302018-12-29T01:00:46+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपा सदस्य, काँग्रेस व अपक्ष सदस्यांची विविध विषय समिती अध्यक्षपदी एकमताने वर्णी लागली.

 Dehrouod Cantonment Board: Subject Committee unconstitutional | देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : विषय समिती बिनविरोध

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : विषय समिती बिनविरोध

googlenewsNext

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपा सदस्य, काँग्रेस व अपक्ष सदस्यांची विविध विषय समिती अध्यक्षपदी एकमताने वर्णी लागली. बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे या नागरी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष भूषविणार असल्याचे सभेत घोषित करण्यात आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये विशाल खंडेलवाल यांची बोर्ड उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समित्यांची पुनर्रचना होणे अपेक्षित होते़ मात्र तब्बल सतरा महिन्यांनी समितीच्या पुनर्रचना करण्यात आली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या गुरुवारी ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषय समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, सी़ विनय व विवेक कोचर उपस्थित होते. अर्थ समिती अध्यक्षपदी ललित बालघरे, शिक्षण समिती अध्यक्षपदी विशाल खंडेलवाल, महिला बाल कल्याण समिती अध्यक्षपदी अपक्ष सदस्य रघुवीर शेलार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष व बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू व सदस्य गोपाळराव तंतरपाळे यांचीही अनुक्रमे आरोग्य व क्रीडा समिती अध्यक्षपदी निवड झाली. विविध समिती अध्यक्ष व सदस्य : नागरी क्षेत्र समिती- सारिका नाईकनवरे (पदसिद्ध अध्यक्ष), अ‍ॅड़ अरुणा पिंजण, ललित बालघरे, विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू (सर्व सदस्य), अभिजित सानप (सदस्य, सचिव).

अर्थ समिती : ललित बालघरे (अध्यक्ष), विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, अ‍ॅड़ अरुणा पिंजण. (सर्व सदस्य), शिक्षण समिती : विशाल खंडेलवाल (अध्यक्ष), ललित बालघरे, अरुणा पिंजण, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू (सर्व सदस्य), महिला बाल कल्याण समिती : रघुवीर शेलार (अध्यक्ष), गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, अरुणा पिंजण, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे ( सर्व सदस्य).

आरोग्य समिती : हाजीमलंग मारीमुत्तू (अध्यक्ष), अरुणा पिंजण, ललित बालघरे, रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, गोपाळराव तंतरपाळे ( सर्व सदस्य). क्रीडा समिती : गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, अरुणा पिंजण

Web Title:  Dehrouod Cantonment Board: Subject Committee unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.