देहू-लोहगाव गटात चौरंगी लढत

By Admin | Published: February 14, 2017 01:58 AM2017-02-14T01:58:38+5:302017-02-14T01:58:38+5:30

जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटातील अनुसूचित जातीसाठी राखीव उमेदवारीअर्ज दाखल केलेल्या १७ पैकी १३ उमेदवारांनी माघार

In the Dehu-Lohgaon group, there are four quadruple fighters | देहू-लोहगाव गटात चौरंगी लढत

देहू-लोहगाव गटात चौरंगी लढत

googlenewsNext

देहूगाव : जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटातील अनुसूचित जातीसाठी राखीव उमेदवारीअर्ज दाखल केलेल्या १७ पैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, कॉँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र देहू-वडगाव शिंदे, निरगुडी लोहगाव गणात नऊपैकी चार उमेदवारांनी माघार घेतली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपा व कॉँग्रेससह एका राष्ट्रवादी बंडखोर उमेदवाराने अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली
आहे.
देहूगाव-लोहगाव गटातील सुधीर दादू ओव्हाळ, सुभाष गुलाब ओव्हाळ, संजय दादू ओव्हाळ, प्रमोद अर्जुन चव्हाण, अनिल प्रभाकर जाधव, अशोक जगन्नाथ जाधव, अजित अशोक जंगम, संतोष प्रकाश भालेराव, निवृत्ती गोपीनाथ राखपसरे,
बाळू बाबुराव राखपसरे, रावसाहेब गोपीनाथ राखपसरे, संतोष सदाशिव राखपसरे व धनंजय सुरेश शिंदे सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. मंगल नितीन जंगम (राष्ट्रवादी कॉँग्रेस), प्रकाश बापूसाहेब जंगम (कॉँग्रेस), संतोष वसंत चव्हाण (भाजपा) शैला राजू खंडागळे (शिवसेना) हे चारच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे देहूगाव लोहगाव गटात चौरंगी लढत होणार आहे.
लोहगाव गणामध्ये नऊ उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी माघारी घेतल्याने पाचच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये छाया शांताराम ओव्हाळ (कॉँग्रेस), सुजाता वसंत ओव्हाळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सविता रमेश कांबळे (अपक्ष), सुरेखा रावसाहेब राखपसरे (भाजपा), सुरेखा अजय वाल्हेकर (शिवसेना) हे उमेदवार रिंगणात आहेत.
छाया सिद्धार्थ ओव्हाळ, मनीषा अशोक जाधव, दीपाली संतोष राखपसरे, माया निवृत्ती राखपसरे (सर्व अपक्ष) यांनी माघार घेतली आहे.
(वार्ताहर)

Web Title: In the Dehu-Lohgaon group, there are four quadruple fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.