देहूगावात दुपारनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा

By admin | Published: February 22, 2017 02:50 AM2017-02-22T02:50:23+5:302017-02-22T02:50:23+5:30

देहू- लोहगाव जिल्हा परिषद गट व देहू, लोहगाव- निरगुडी वडगाव शिंदे गणातील मतदान शांततेत पार पडले.

Dehugaon after the long haul of voters in the afternoon | देहूगावात दुपारनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा

देहूगावात दुपारनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा

Next

देहूगाव : देहू- लोहगाव जिल्हा परिषद गट व देहू, लोहगाव- निरगुडी वडगाव शिंदे गणातील मतदान शांततेत पार पडले.
जिल्हा परिषद चार व पंचायत समितीसाठी असलेल्या पाच उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्यो बंद झाले. मतदारांनी कसा कौल दिला हे गुरुवारी (दि. २३) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळी साडेसातला मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मात्र, सकाळी कोणत्याही मतदान केंद्रावर नियोजित वेळेत कोणत्याही पक्षाचा वा उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी हजर नसल्याने केंद्राध्यक्षांनी नियमानुसार कामाकाजाला सुरुवात करून मतदानासाठी मतदान यंत्रे तयार केली. हेमलता काळोखे, हेमा मोरे, रत्नमाला करंडे, संतोष चव्हाण, शैला खंडागळे, वनिता देशकर हे सर्वच उमेदवार देहूगावातील असल्याने त्यांनी आपापल्या केंद्रांवर सकाळी आठच्या आतच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावण्यास सुरवात केली.
सकाळी गावात गर्दी होऊ लागली असता येथील उपविभागीय अधिकारी मुजावर व पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. पोलिसांच्या वतीने चौकात गर्दी करू नये वाहतुकीस अडथळा ठरेल अशी वाहने आणि हातगाड्या हटविण्याची वारंवार उद्घोषणा ध्वनिक्षेपकावरून केली जात होती.
पहिल्या दोन तासात केवळ पाच ते सहा टक्केच मतदान झाले होते. सकाळी साडेअकरापर्यंत हे प्रमाण १३ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान होते. दुपारी दीडच्या सुमारास मतदानाची टक्केवारी वीस टक्क्याच्या आसपास होती. दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी वाढत जाऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदानाची टक्केवारीही वाढू लागली होती. सकाळी १२च्या सुमारास काही विठ्ठलनगर येथील १३ नंबरच्या व माळीनगर येथील १६ नंबर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. तेथे काहीशा रांगा लागल्या
होत्या. (वार्ताहर)

 येथील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या भुजबळ व दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या भरत विष्णू काळोखे, शरद खोल्लम यांनी केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
 स्लिप वाटण्याचे कष्ट न घेतल्याने मतदारांना विविध पक्षांच्या बूथवरून नाव शोधावे लागत होते. काही कार्यकर्ते मोबाइलवर डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपवर ता शोधून देत होते. मात्र वृद्ध व महिलांना त्यांचा शोध घेणे व मतदानाला जाणे जाचक वाटत होते. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक केंद्रासाठी बीएलओची नेमणूक केली होती. मात्र त्यांना मतदारांचे नाव शोधण्यासाठी वेळ जात होता. त्यामुळे मतदान केंद्राच्या आवारात गर्दी राहत होती. काही उमेदवारांचे कार्यकर्ते मतदान केंद्रामधूनच मतदारांना काही काळ आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत होते. पोलीस त्यांना वारंवार बाहेर काढत होते. मात्र, कार्यकर्ते काही ना काही कारण काढून थांबत होते.
 बहुतेक सर्वच उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना हॉटेलची कूपन दिली होती. हॉटेलमध्ये कूपन देऊन नाष्टा दिला जात होता, तर काही उमेदवारांनी जेवणाची व्यवस्था केली होती.
 कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. सकाळी मतदानासाठी आलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. हा उपक्रमाचे कौतुक करीत मतदार मतदानाला गेले. हा उपक्रम नागरी हक्क मंच व कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला.

Web Title: Dehugaon after the long haul of voters in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.