देहूरोड मनसे अध्यक्षास पिस्तूल, काडतुसासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची किवळेत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:55 PM2017-12-04T12:55:38+5:302017-12-04T12:57:51+5:30
मुकाई चौकात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून गावठी बनावटीचो एक पिस्तूल तसेच एक जिवंत काडतुसे हस्तगत करून त्यास अटक केली आहे.
पिंपरी : किवळे येथील मुकाई चौकात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल तसेच एक जिवंत काडतुसे हस्तगत करून त्यास अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती मिळाल्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळे येथील मुकाई चौकात देहूरोड शहर मनसेचे अध्यक्ष विनोद इराण्णा भंडारी (वय ३४, रा. दत्तनगर, किवळे, ता. हवेली, जिल्हा पुणे) यास ताब्यात घेऊन त्याची खोलवर चौकशी केली असता त्याच्याकडील गावठी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुसे त्याने काढून दिले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने भंडारीस पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.