धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:48 AM2018-07-13T01:48:05+5:302018-07-13T01:48:38+5:30

माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

delay due to failure to get funds at the right time | धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब

धोकादायक गावांची कामे ठप्प, योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्याने विलंब

Next

पुणे : माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे धोकादायक गावांची कामेही निविदा प्रक्रियेत अडकून राहिल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ या तालुक्यांतील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.
त्यानुसार संबंधित गावांभोवती सुरक्षा भिंत बांधणे, पावसाच्या पाण्याला योग्य दिशा देणे, झाडे लावणे आदी कामे केली
जाणार होती. त्यामुळे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गेल्या वर्षी ही या गावांच्या विकासकामांसाठी निधी नव्हता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेण्याबाबत चर्चा झाली होती.

फुलवडेजवळील भगतवाडी, माळीण परिसरातील परसवाडी, आसाणे, जांभोरीजवळील काळेवाडी आणि बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर).

त्यामुळे या गावांची कामे सुरू करण्यास विलंब झाला.जिल्हा प्रशासनातर्फे काही गावांची विकास कामे सुरू करण्यत आली होती.तर, काही गावांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे.

Web Title: delay due to failure to get funds at the right time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.