पस्तीस देशांच्या प्रतिनिधींनी दिली महापालिकेस भेट
By admin | Published: January 26, 2017 12:17 AM2017-01-26T00:17:36+5:302017-01-26T00:17:36+5:30
आंतरराष्ट्रीय ई-गव्हर्नन्स लेखा परीक्षणाबाबतची माहिती घेण्यासाठी ३५ देशांच्या प्रतिनिधींनी महापालिकेस भेट दिली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे
पिंपरी : आंतरराष्ट्रीय ई-गव्हर्नन्स लेखा परीक्षणाबाबतची माहिती घेण्यासाठी ३५ देशांच्या प्रतिनिधींनी महापालिकेस भेट दिली.
या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, मुख्य लेखापाल राजेश लांडे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सिस्टीम अॅनालिस्ट अनिता कोटलवार, विजय बोरुडे, तसेच किशोर केदारी, प्रकाश बने आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल सेंटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्स अँड आॅडिट ही एक भारतीय महालेखागार यांनी स्थापित केलेली संस्था आहे. संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते. या संस्थेमार्फत ३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत १३४ वे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
भारतातील ई-गव्हर्नन्स प्रकल्प यशस्वीरीत्या राबविलेल्या महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड पालिकेचा समावेश असल्याने सदर संस्थेमार्फत विविध देशातील प्रतिनिधींनी भेट दिली. (प्रतिनिधी)