कचरा व्यवस्थापनेचा बोजवारा

By admin | Published: May 30, 2017 02:35 AM2017-05-30T02:35:01+5:302017-05-30T02:35:01+5:30

शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने शहरातील

Deletion of waste management | कचरा व्यवस्थापनेचा बोजवारा

कचरा व्यवस्थापनेचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने शहरातील रस्त्यांवर कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने शहराची पुरती वाट लागली असल्याचे वास्तव विविध भागांत दिसत आहे.
विविध उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छतेबाबत उपदेश देणारे पालिका प्रशासन नियोजनात कुचकामी ठरत असल्याने नागरिक याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. कचरा व्यवस्थापन प्रक्रिया फक्त कागदोपत्री वापरली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या ही मुख्य समस्या झाली आहे.
यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. कचराकुंड्या वेळोवेळी साफ होत नसल्याने अडचणी येत आहेत. या ठिकाणी भटक्या कुत्र्याचा वावर वाढला आहे. याबाबत नागरिक वारंवार तक्रार करतात. मात्र, दोन दिवस त्याची दखल घेतली जाते. मात्र, पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कामाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. शहरातील कचराकुंड्या नियमित साफ कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Deletion of waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.