हल्लेखोरावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:20 AM2017-08-08T03:20:55+5:302017-08-08T03:20:55+5:30
खुलेआम हातात चाकू घेऊन पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न एकाने केला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. नागरिकांनी सतर्कता दाखविल्याने महिलेचे प्राण वाचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : खुलेआम हातात चाकू घेऊन पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न एकाने केला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. नागरिकांनी सतर्कता दाखविल्याने महिलेचे प्राण वाचले. या महिलेच्या नातेवाइकांनी सोमवारी आमदार डॉ. नीलम गोºहे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
मोशी प्राधिकरण येथील आरटीओ कार्यालयामागील मोकळ्या जागेत भोसरीतील नागरिकांनी रविवारी भर दुपारी हा थरार अनुभवला. फरहाना फिरोज शेख (वय २६, रा. वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) या महिलेच्या केसाला धरून पती फिरोज अली शेख (वय ३०) याने तिला फरफटत नेले. शिवीगाळ करीत तिच्यावर चाकूचे वार केले. त्या वेळी महिलेने आरडाओरडा केली. त्या वेळी नागरिकांनी धाव घेऊन आरोपीला पकडले. त्याच्या ताब्यातून फरहाना हिची सुटका केली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ त्यातून ती बचावली़ यापुढेही तिच्या जिवाला धोका संभवतो. अशी भीती व्यक्त करून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती डॉ. गोºहे यांच्याकडे महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे.