सासऱ्याकडून सुनेकडे शरीरसुखाची मागणी; पतीनेही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:46 PM2022-11-14T14:46:34+5:302022-11-14T14:46:43+5:30
आरोपी पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : तुझ्या नवऱ्याचे कर्ज फेडतो. तु मला खुप आवडतेस असे म्हणत सुनेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून सासऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या विषयी तिने पतीला सांगितले असता पतीने आपल्या वडिलांची पाठराखन करत मला तुझ्यात रस नाही तू त्यांची इच्छा पूर्ण कर, असे सांगितले. ही घटना २०१८ ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.१३) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पती आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. त्याला फिर्यादीेने विरोध केला तेंव्हा पतीने फिर्यादीला मारहाण करून खेड येथे राहण्यासाठी नेले. तेथे फिर्यादीचे सासरे आले त्यांनी तुझ्या नवऱ्याला बाहेराचा नाद आहे. त्याच्यावर असणारे कर्ज तो फेडू शकत नाही. मी तुमच्या दोघांचे कर्ज फेडतो. तसेच त्याच्या नावावर जमीन करतो. परंतु माझ्यासोबत संबंध ठेव. तुझा नवरा आता तुझ्यासोबत संबंध ठेवणार नाही. असे म्हणत चुकीच्या पद्धतीने फिर्यादीला स्पर्श करुन मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या बाबत फिर्यादीने आपल्या पतीला सांगितले असता. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत माझा बाप माझे कर्ज फेडणार आहे. तु त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असे सांगितले.