Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे पावणेअकरा कोटींच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:18 PM2022-05-16T16:18:47+5:302022-05-16T16:23:44+5:30

हिंजवडी फेज एक येथे २७ ऑगस्ट २०२१ रोजी हा प्रकार घडला...

demand for Rs 11 crore ransom from builder pune crime news | Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे पावणेअकरा कोटींच्या खंडणीची मागणी

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे पावणेअकरा कोटींच्या खंडणीची मागणी

Next

पिंपरी : विकसन करारनाम्यात बांधकामाची जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. पाच हजार चौरस फूट वाढीव बांधकाम करून द्यावे अथवा १० कोटी ८५ लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परसीस्टंट कंपनीच्या बाजूला असलेल्या ज्यूस सेंटरवर हिंजवडी फेज एक येथे २७ ऑगस्ट २०२१ रोजी हा प्रकार घडला.

चंदू लक्ष्मणदास रामनानी, किरण चंदू रामनानी (दोघेही रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सचिन किरणदास सोनिगरा (वय ३५, रा. चिंचवड स्टेशन) यांनी रविवारी (दि. १५) हिंजवडी पोलिसांनी ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सोनिगरा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. लीगसी टॉवर असोसिएट ही नंतर रुपांतर झालेली लीगसी टावर्स असोसिएट एलएलपी यांच्यातर्फे रावेत येथील सर्वे नं. १०६ येथील १५ गुंठे क्षेत्रात बांधकाम केले जात आहे. चंदू आणि किरण यांनी संगनमत करून संबंधित जागा महार वतनाची आहे, याचा उल्लेख न करता जाणूनबुजून फिर्यादीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवून फिर्यादीचे १८ लाख रुपयांचे नुकसान केले.

विकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा १० कोटी ८५ लाख रुपयांची खंडणी नाही दिली तर पोलिसात तक्रार करण्याची तसेच बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची आरोपींनी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.

Web Title: demand for Rs 11 crore ransom from builder pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.