रॅम्पचा पुनर्विचार करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:15 AM2017-08-02T03:15:59+5:302017-08-02T03:15:59+5:30
काळेवाडी- आॅटो क्लस्टर मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलावरून उतरणाºया रॅम्पबाबत एम्पायर इस्टेटमधील रहिवाशांमध्ये नाराजी
पिंपरी : काळेवाडी- आॅटो क्लस्टर मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलावरून उतरणाºया रॅम्पबाबत एम्पायर इस्टेटमधील रहिवाशांमध्ये नाराजी असल्याचे पहायला मिळत आहे. या पुलावरून प्रवास करणाºया वाहनांना पुणे-मुंबई महामार्गावर उतरण्यासाठी रॅम्प करण्यात येत आहेत. मात्र, हे रॅम्प येथील नागरिकांसाठी गैरसोईचे ठरू शकतात, असे येथील नागरिकांचे मत आहे.
सुमारे १.९ किमी अंतर असलेल्या या उड्डाणपुलावरून एम्पायर इस्टेट येथे रॅम्प उतरविण्यात येत आहे. हा रॅम्प सुरू झाला तर सोसायटीच्या प्रवेशद्वारावर वाहतूककोंडीची समस्या नियमित उद्भवू शकते. शिवाय येथे अनधिकृत वाहनतळ बनण्याचा धोका आहे. तसे झाले तर सोसायटीमधील रहिवाशांना रहदारीस रस्ता अपुरा पडू शकतो. शिवाय या परिसरात हवा आणि ध्वनिप्रदूषणही वाढणार आहे. रहदारीस जागा कमी राहिल्यास आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक गाड्या, रुग्णवाहिका पोहचण्यास अडथळा निर्माण होणार आहे, अशी माहिती एम्पायर इस्टेट फाउंडेशन(टू)चे सचिव राम खेडकर यांनी दिली.
नाशिक फाटा येथे ज्याप्रमाणे रॅम्प केला आहे़ तसा महामार्गावर रॅम्प करणे. तसेच आॅटो क्लस्टरच्या बाजूला का रॅम्प उतरविण्याचा पर्यायही खुला आहे. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या नागरिकांकडून हा रॅम्प स्थलांतरित करण्याची मागणी जोर धरू
लागली आहे.