सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात, सुरक्षा साधनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:34 AM2018-09-26T02:34:27+5:302018-09-26T02:34:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून, त्यांना जीवनावश्यक वस्तंूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवाव्यात, अशी मागणी सफाई कर्मचा-यांकडून होत आहे.
निगडी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून, त्यांना जीवनावश्यक वस्तंूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवाव्यात, अशी मागणी सफाई कर्मचाºयांकडून होत आहे. तसेच चिखली, मोरे वस्ती येथील कचरा यार्डमधील स्वच्छतेची कामे करणाºया कामगारांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योजना असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे सफाई कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.
फ प्रभागातील निगडी , रुपीनगर , यमुनानगर, साईनाथनगर, चिखली, मोरे वस्ती आदी भागातून रोज उचलण्यात येणारा कचरा चिखली, मोरे वस्ती येथील स्पाईन रोडच्या महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेत ठेवण्यात आलेल्या कुंडीत खाली केला जातो. रोज सुमारे ४५ कचरा गाड्या येथे खाली होत असल्याने येथील कुंड्या ओसंडून वाहत आहेत. या ठिकाणी कचºयाचे मोठे मोठे ढीग साचले आहेत. या ठिकाणचा साठविलेला कचरा रोजच्या रोज उचलून नेण्याची नियमावली असताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांमुळे येथील कचºयाची रोजच्या रोज विल्हेवाट होत नसल्याने प्रभागातून उचलून आणलेला कचरा तसाच साठून राहतो . त्यामुळे स्पाईन रोड परिसरात दुर्गंध पसरला आहे. यामुळे येथील कचºयाची वेळीच विल्हेवाट लावण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहे.
कामगारांना गणवेश, साबण, टॉवेल, मास्क, तसेच पावळ्यात गमबुट, रेनकोट देणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र या सुविधा त्यांना मिळत नाहीत. सफाई कामगार भर पावसातच कोणत्याही सुविधा मिळत नसतानाही हाताने घाण साफ करीत आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य सुदृढ ठेवणाºया या सफाई कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षा मात्र वाºयावर आहे. त्यामुळे या सफाई कामगारांना तत्काळ सुरक्षेची आवश्यक साधने देण्यात व कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित कामे देण्यात यावीत, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
1फ प्रभागातील रुपीनगर, यमुनानगर , चिखली, तळवडे आदी भागातून सुमारे ४५ कचºयाच्या गाड्या चिखलीतील स्पाईन रस्त्यावरील कचरा यार्डमध्ये खाली होतात. या ठिकाणी छोट्या गाडीतून आणलेला कचरा मोठ्या गाडीत टाकून तो कचरा कचराडेपोकडे नेला जातो. प्रभागातून उचलून आणलेला कचरा येथे उपलब्ध असलेल्या कुंडीत टाकला जातो ती कुंडी हायड्रॉलिक साखळीला बांधून मोठ्या गाडीत टाकली जातो; परंतु येथे आणला जाणारा कचरा कुंडीत ना टाकता सफाई कर्मचाºयांना कोणत्याही सुरक्षेच्या साधनाविना छोट्या गाडीतील कचरा मोठ्या गाडीत धोकादायक पद्धतीने ओढावा लागतो.
2यामुळे येथे काम करीत असलेल्या महिला व पुरुष कर्मचाºयांना जीव मुठीत धरून दोन्ही गाड्यांच्या मधोमध थांबून धोकादायक पद्धतीने कचरा ओढावा लागतो. हायड्रॉलिक साखळीचा वापर होत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र कोणती मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल सफाई कामगार वर्गातून होत आहे. मात्र प्रशासनाकडून सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधने मिळत नसल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
3हातमोजे, गमबुट, मास्क, रेनकोट, गणवेश, साबण अशा किमान सुविधाही त्यांना पुरविल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू असल्याने कामगारांना वाईट परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
4शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाºया या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने दिली जात नाहीत. सतत घाणीत काम करीत असल्याने अनेकांना टीबीची लागण होते. त्यांच्या आरोग्यासाठीच्या पालिकेच्या अनेक योजना केवळ कागदावरच आहेत. त्यांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचत नाही.
येथील सफाई कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . सफाई कामगारांना तत्काळ सुरक्षेची आवश्यक साधने देण्याचे व या ठिकाणी काम करणाºया सफाई कामगारांची सुरक्षेची काळजी घेण्यात यावी याबाबत संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. याबाबत त्वरित दखल न घेतल्यास सफाई कामगारांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करणार आहे.
- कमल घोलप, अध्यक्षा,
फ क्षेत्रीय कार्यालय