महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:54 AM2017-09-15T02:54:06+5:302017-09-15T02:55:00+5:30

अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.

 Demand for water supply from the house of Municipal Commissioner | महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

महापालिका आयुक्तांच्या घरातून पाणी भरून देण्याची मागणी  

Next

वाकड : येथील अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीत १९९४ पासून कष्टकरी, कामगार, मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, सोळाशेच्या वर लोकसंख्या आहे. मात्र महापालिकेच्या नळकोंडाळ्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून पाणी भरण्याची मुभा मिळावी, असे विनंती करणारे पत्र अपना वतन संघटनेने आयुक्तांना दिले आहे.
येथील महिलांना पूर्वी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती. पाण्याची सोय नसल्याने येथे वादविवाद, भांडण-तंटे होत होती. येथील नागरिकांच्या वतीने अपना वतन संघटनेने वारंवार महापालिकेशी पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी आंदोलने केली. त्यामुळे २०१४ मध्ये या ठिकाणी पाण्याची लाइन टाकण्यात आली. परंतु ग्रुप कनेक्शन देण्यात आले. पाच जणांमध्ये एक कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसातून एका व्यक्तीचा पाण्याचा नंबर येतो. पूर्वी पाण्याचा प्रेशर चांगला असल्याने काही अडचणी आल्या नाहीत. परंतु २०१७च्या निवडणुकीनंतर आजतगायत या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येऊ लागले. एकतर पाच दिवसांतून नंबर, त्यात प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित पाणीपुरवठा अधिकाºयाकडे तक्रार केली. परंतु त्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.
तसेच काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: वरच्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदील झाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या येथील नागरिकांना पाण्याअभावी असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामे करण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगर परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा तातडीने मुबलक व सुरळीत करावा. येत्या शुक्रवारपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व महिला १६ सप्टेंबरला सकाळी हंडा-कळशी घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पाणी भरण्यासाठी येतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title:  Demand for water supply from the house of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे