आरक्षणासाठी धनगर बांधवांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:46 AM2018-08-24T03:46:27+5:302018-08-24T03:46:53+5:30
ज्येष्ठ व युवक धनगर बांधवांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला
पिंपळे गुरव : जुनी सांगवीतील पुण्यश्लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसरातील सर्व धनगर समाजबांधव एकत्र येऊन मागण्यांबाबत घोषणा देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन दिले.
ज्येष्ठ व युवक धनगर बांधवांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्या ठिकाणी निवेदनातील मुद्दे वाचून दाखवले, या नंतर अहल्यादेवीच्या नावाचा गजर करण्यात आला. धनगर समाज आरक्षण आमंलबजावणीसाठी शहीद युवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राजमाता अहल्यादेवी होळकर पुतळा, जुनी सांगवी ते शितोळे चौक ते साई चौक नवी सांगवी ते कृष्णा चौक ते काटेपुरम चौक पिंपळे गुरव असे मार्गक्रमण करत सर्व धनगर समाजबांधवांनी पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयासमोर निवेदन दिले.
आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते. मनोजकुमार मारकड यांनी आमदारांना पिवळा पंचा घालून मोर्चाचे कारण व नियोजनाची माहिती सांगितली. आमदार जगताप म्हणाले, हे निवेदन मुख्यमंत्री व पक्षाचे वरिष्ठ मंडळाकडे मांडणार आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे.
डॉ. अतुल होळकर, सचिन सरक, रामेश्वर हराळे, संतोष काशिद, संतोष वाघमोडे, बाबासाहेब चितळकर, मारुती काळे, बिरू व्हनमाने, विकास येळगे, सूर्यकांत गोफणे, अभिमान्यू गाडेकर, छगन वाघमोडे, नगरसेविका आशा धायगुडे, अनुराज दूधभाते, किसन फसके, नवनाथ भिटे, डॉ. दिनेश गाडेकर, संदीपान सामसे, मेजर गोफणे, नारायण मदने, योगेश तरंगे, संतोष मदने, कोकरे, शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.