भाजपा उमेदवारांकडून मतदानाबाबत प्रात्यक्षिक

By admin | Published: February 15, 2017 02:10 AM2017-02-15T02:10:08+5:302017-02-15T02:10:08+5:30

प्रचारासह भाजपाच्या उमेदवारांकडून मतदानाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. मतदानप्रक्रिया आणि मतदान यंत्राबाबत

Demonstration of voting by BJP candidates | भाजपा उमेदवारांकडून मतदानाबाबत प्रात्यक्षिक

भाजपा उमेदवारांकडून मतदानाबाबत प्रात्यक्षिक

Next

पिंपरी : प्रचारासह भाजपाच्या उमेदवारांकडून मतदानाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. मतदानप्रक्रिया आणि मतदान यंत्राबाबत या उमेदवारांकडून प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात येत आहे. भाजपाला मत देण्याचे आवाहन या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. न चुकता मतदान करून भाजपाच्या उमेदवारांनाच विजयी करु, असा निर्धार येथील मतदारांनी या वेळी केला.
वाकड-पुनावळे-ताथवडे या प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाचे उमेदवार विशाल कलाटे, राम वाकडकर, सीमा आल्हाट आणि भाजपा पुरस्कृत उमेदवार ज्योती ओव्हाळ यांच्याकडून मतदारांना मतदानाबाबत आवाहन करण्यात येत आहे. विशाल कलाटे, राम वाकडकर आणि सीमा आल्हाट यांचे कमळ चिन्ह असून, ज्योती ओव्हाळ यांचे चिन्ह कपाट आहे.
वाकड येथील विनोदेनगर परिसरात चाळींमध्ये महिला आणि ज्येष्ठ मतदारांना भाजपाच्या उमेदवारांनी मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. चार उमेदवार निवडून द्यायचे असून, त्यासाठी चार मते द्यायची आहेत. एका यंत्रावर दोन मते देता येणार असून, दोन यंत्रावर एकूण चार मते देता येणार आहेत.
या वेळी ‘डमी व्होटिंग मशिन’च्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. केवळ चार वेळा बटण दाबायचे असून, न
चुकता मतदान करा आणि
भाजपाला विजयी करा, असे आवाहन या वेळी भाजपाच्या उमेदवारांनी
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstration of voting by BJP candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.