आत्मदहनाचा इशारा देणारे आंदोलक पोलिसांच्या देखरेखेखाली : आंदोलकांचा अन्नत्याग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:46 PM2018-08-03T13:46:55+5:302018-08-03T13:56:56+5:30

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनात आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत.

Demonstrators of self-harm are under supervision: | आत्मदहनाचा इशारा देणारे आंदोलक पोलिसांच्या देखरेखेखाली : आंदोलकांचा अन्नत्याग 

आत्मदहनाचा इशारा देणारे आंदोलक पोलिसांच्या देखरेखेखाली : आंदोलकांचा अन्नत्याग 

Next
ठळक मुद्देआमच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीआत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न

रावेत : पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न फसल्याने वाकड पोलिसानी गुरुवारी रात्री ११ वाजता शहरा बाहेर जाऊन भूमिगत होण्याच्या तयारीत असताना ९ आंदोलकांना रहाटणी येथून ताब्यात घेऊन देखरेखीखाली ठेवले आहे.पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून इशारा देणाऱ्या समन्वयकाना ताब्यात घेतले. सतीश काळे यांच्यासह छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मोर्चाचे समन्वयक धनाजी येळकर-पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, भैय्यासाहेब गजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार, आणि अंतिम जाधव अशी सामूहिक आत्मबलिदानाचा इशारा देणाऱ्या आंदोलक तरुणांची नावे आहेत. 
सर्वांनी मागण्या मान्य होईपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये अन्नत्याग करण्यासाठी रात्री पासून बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनासाठी आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता शनिवार (दि ४) रोजी सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा मोचार्चे पिंपरी-चिंचवड समन्वयक सतीश काळे व त्यांच्या नऊ दिलेला होता. आमच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.तत्पूर्वी त्यांनी ते पुणे जिल्हाधिकारी नवलराम आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनाही दिले आहे. ते मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिसांनी आरक्षणाचा निर्णय अपेक्षित असल्याने हे पाऊल उचलू नका असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरक्षणाला काही महिने लागणार असल्याचे लक्षात येताच हे तरुण आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. 

Web Title: Demonstrators of self-harm are under supervision:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.