अवसरीत सांडपाण्याची समस्या
By admin | Published: October 15, 2016 05:45 AM2016-10-15T05:45:41+5:302016-10-15T05:45:41+5:30
येथील न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय रस्त्याच्या दोन्हीही बाजूनी सांडपाण्याची डबकी साचल्याने दुर्गंधी, डास मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक
अवसरी : येथील न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय रस्त्याच्या दोन्हीही बाजूनी सांडपाण्याची डबकी साचल्याने दुर्गंधी, डास मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक रहिवाशांना डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने दिवाळी अगोदर पाण्याची डबकी बुजवावी. या वस्तीवर चांगल्या दर्जाची बंदिस्त गटार योजना व्हावी, अशी मागणी केली आहे.
अवसरी खुर्दु गावठाणअंतर्गत न्हावीवाडा परिसरात रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत डास, मच्छर घरात बसून देत नाही. मोठे डास असल्याने हाता-पायाला चावा घेतात. या परिसरातील रस्त्यावरून जाताना पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाक दाबून जावे लागत आहे. याबाबत स्थानिक महिलांची ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार केली आहे. न्हावीवाडा ते पोस्ट कार्यालय बंदिस्त गटार योजनेसाठी संबंधित ठेकेदाराने सिमेंटचे पाइप गाडले आहे. ठेकेदाराला गाडलेले पाइप काढून दर्जेदार पाइप टाकण्यास सांगावे. तोपर्यंत ठेकेदाराचे बिल आदा करू नये, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)