देहूत ८२९ बालकांची तपासणी

By admin | Published: December 22, 2016 02:00 AM2016-12-22T02:00:05+5:302016-12-22T02:00:05+5:30

हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथे ८२९ बालकांची तपासणी करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने

Dept. 82 9 Checking of Children | देहूत ८२९ बालकांची तपासणी

देहूत ८२९ बालकांची तपासणी

Next

देहूगाव : हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथे ८२९ बालकांची तपासणी करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीपयोगी अवजारांचे वाटप हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी सरपंच सुनीता टिळेकर, शलाका गोलांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा, बालविकास प्रकल्प अधिकारी महेंद्र वाकनीस आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये बालकांची आरोग्य तपासणी करून मातांना डॉ. राजेश करंबेळकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रियंका भटे, डॉ. सारिका चव्हाण, डॉ. काशिद यांनी बालकांची तपासणी केली. पंचायत समितीचे मेमाणे यांच्या प्रयत्नाने मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात
आली. डॉ. विलास मेमाणे, डॉ. हावदेकर, डॉ.पाटील आदींनी परिश्रम घेत १६२ रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे आयोजन पंचायत समितीच्या सेस फंडामधून करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Dept. 82 9 Checking of Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.