पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 19:51 IST2024-06-23T19:50:14+5:302024-06-23T19:51:10+5:30
शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे

पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु
पवनानगर: पवना धरणात बुडून १८ वर्षीय तरुण बुडाल्याची घटना रविवारी (दि.२२) रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास फांगणे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. अद्ववेत सुदेश शर्मा (वय १८, सध्या रा. विमाननगर पुणे, मुळ. दिल्ली)असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस कॉलेज येथे शिकत होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील पाच मित्र मैत्रिणी पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.