Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:24 AM2021-10-25T10:24:04+5:302021-10-25T10:38:53+5:30
आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले
पिंपरी : शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले. रोझलँड प्रीविंकल क्लब, पिंपळे सौदागर येथे रविवारी रात्री ही घटना घडली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, रोझलँड प्रीविंकल क्लब, पिंपळे सौदागर येथे असलेल्या विद्यूत राेहित्र असून, तेथे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडून नारळाच्या झाडाने पेट घेतला. तसेच क्लबच्या इमारतीच्या टेरेसवर असलेला लाकडी कॉट व इतर काही साहित्य जळून खाक झाले.
पिंपरीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड आणि इमारतीवरील वस्तू जळून खाक #pune#FIREpic.twitter.com/C7XbRklT9T
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2021
याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या रहाटणी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या घटनेने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने क्रिकेटच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान संघांदरम्यानचा सामना पाहण्यास उत्सुक असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पाणी पडले.