नीतिमूल्यांचा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:41 AM2017-08-03T02:41:46+5:302017-08-03T02:41:46+5:30
सध्या स्पर्धेचा काळ आहे़ त्यामध्ये प्रत्येक जण मार्कांच्या मागे पळताना दिसतात. मात्र, विद्यार्थ्यांनी गुणांच्या मागे न धावता नीतिमूल्यांमध्ये विकास करावा, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी : सध्या स्पर्धेचा काळ आहे़ त्यामध्ये प्रत्येक जण मार्कांच्या मागे पळताना दिसतात. मात्र, विद्यार्थ्यांनी गुणांच्या मागे न धावता नीतिमूल्यांमध्ये विकास करावा, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ रावेत यांच्यातर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम रावेत येथील इस्कॉन श्री गोविंदधाम येथे झाला. या वेळी ते बोलत होते. गोपाती दास, महापौर नितीन काळजे, भाऊ अभ्यंकर, शरद इनामदार, गोविंद दाभाडे उपस्थित होते.
शहरातील प्रथम आलेल्या ६ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पाचवी ते सात वी या गटात भोसरी येथील भैरवनाथ विद्यालयातील आदिनाथ सोमनाथ बोरसे हा पहिला तर भोसरीतील आदर्श विद्यालयातील अभिषेक सतीश बनसोडे याचा दुसरा क्रमांक आला तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील मुलींच्या प्रशालेतील अंजना अनिल पासवान हिचा तिसरा क्रमांक आला.
तर आठवी ते दहावी या गटात आकुर्डीतील सरस्वती विद्यालयाच्या राज पांडुरंग कांबळेचा पहिला, शाहूनगरच्या अभिषेक विद्यालयाच्या सिद्धी जयसिंग पुरेचा दुसरा तर निगडीतील मॉडर्न हायस्कूलच्या निकीता विनायक सरतापेचा तिसरा क्रमांक आला आहे. या सहा जणांना आयुक्तांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. या कार्यक्रमासाठी विलास चव्हाण, विजय पाळखे, ममता जयसिंगपुरे, गंगाधर सोनवणे, गुरु गौरांग दास यांनी सहकार्य केले. या वेळी सूत्रसंचालन धनश्री शिंदे व दिनेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार गुरु गौरांगदास यांनी केले.