Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

By विश्वास मोरे | Published: August 2, 2024 03:45 PM2024-08-02T15:45:36+5:302024-08-02T16:22:26+5:30

समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायचं आहे, यावर निर्णय घेणे बाकी

Devendra Fadnavis got me stuck in this because I was not getting stuck manoj Jarange Patal's allegation | Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

पिंपरी: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यात अडकवला आहे. बदनामी केली जात आहे. छत्रपतींचा इतिहास दाखविण्यात कसली बदनामी,  नाटक लोकांना दाखविताना तोटा आला. मग काय करायचे? असा दावा मराठा आरक्षण (Maratha Reservation) योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पिंपरीत केला आहे. पुणे न्यायालयात एका दाव्यासंदर्भात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे हजर शुक्रवारी हजर होणार असल्याने गुरुवारी रात्री उशिरा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. दरम्यान जरांगे पाटील यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांसह पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेतला. 

ताकदीने कामाला लागलो आहे !

विधानसभा निवडणूक लढविणार कि नाही? यावर प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले, 'राजकारणात आम्हांला ढकलले जात आहे. आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. इतर समाजानेही आम्हांला पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायच आहे. यावर निर्णय घेणे बाकी आहे. याचा निर्णय २९ ऑगस्टला होणार आहे. आमचे टार्गेट कोण आहे, हे आणि १९ ऑगस्टला सांगू. २९ तारखेपर्यंत मी काहीच नाही बोलणार. थोडे थोडे राजकारण मलाही समजु लागले आहे.'

जरांगे पाटील म्हणाले, 'नाट्य दिग्दर्शकाचा फसवणुकीचा प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. मात्र,  मी न्यायालयाचा सन्मान केलेला आहे. मी आज हजर व्हायला जात आहे. महाराजांचा इतिहास जनतेला दाखविण्याच्या उद्देशाने शंभूराजे महानाट्य दाखवण्यात आले. त्या नाटकाशी माझा संबंध आहे. मात्र, त्या नाटकाच्या व्यवहाराची माझ्या काही संबंध नाही. शंभूराजे नाटकाचे तोटा झाला होता. तो आम्ही तिघांनी वाटून घेतला होता. ज्यावेळी हा नाटक आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळेस पण आम्ही सामान्य पोर  होतो आणि आम्ही आज देखिल सामान्य पोरच आहोत.  त्यातील एका व्यक्तीने दिग्दर्शकाला पैसे भरून देण्याचे आश्वासन दिले होते. आमच्यातला एक जण म्हणाला की, माझ्या आणि दिग्दर्शकाचा बरं आहे.  मी त्याला पैसे देतो.  मात्र, ते त्यांनी दिले की नाही, हे मला माहित नाही.'

Web Title: Devendra Fadnavis got me stuck in this because I was not getting stuck manoj Jarange Patal's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.