लांबचे मतदान केंद्र मिळाल्याने अडचणींत भर

By admin | Published: February 18, 2017 03:17 AM2017-02-18T03:17:40+5:302017-02-18T03:17:40+5:30

महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात

Difficulties in getting the long-distance polling station | लांबचे मतदान केंद्र मिळाल्याने अडचणींत भर

लांबचे मतदान केंद्र मिळाल्याने अडचणींत भर

Next

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात आलेली केंद्रेही निश्चित केली आहेत. परंतु, या मतदान केंद्र वाटपामध्ये महिला शिक्षिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील ठिकाणे देण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. महिला शिक्षिकांना दहा ते बारा किलोमीटरच्या आतील केंद्र मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. तसे करणे शक्य नसल्यास शिक्षकांना सामंजस्याने केंद्रांची अदलाबदल करू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महिला शिक्षिकांमधून करण्यात येत आहे.
येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष अणि मतदान अधिकारी नेमण्यात येतात. यावेळी मतदानासाठी चार मशिन्स ठेवण्यात येणार आहेत.
मतदान सुरू होण्याच्या साधारण एक ते दीड तास आधी केंद्रावर पोचावे लागते आणि मतदान संपल्यानंतर चार ते पाच तास थांबावे लागते. त्यामुळे भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या शिक्षिकांना रात्री घरी येण्यास खूप उशिर होतो. यावेळी तर कोणाला कोणत्या मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहे, याची माहिती आदल्या दिवशी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आधी जाऊन केंद्र पाहून घेण्याची सोयच राहिली नाही.
‘लोकमत’शी संपर्क साधून आपली कैफियत मांडलेली एक शिक्षिका कोथरूड परिसरात राहण्यास आहे. या शिक्षिकेला मांजरी येथील केंद्र आले आहे. हे अंतर जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे. भल्या पहाटे घर सोडलेल्या महिलांना एकटेच केंद्रापर्यंत जावे लागणार  आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर  माणसे नसतात, अंधार असतो. अशा स्थितीत रस्ता चुकल्यास  कोणाला पत्ता विचारणार असा प्रश्न आहे. यासोबतच अनेक शिक्षिकांच्या घरी लहान मुले आहेत. त्याचाही विचार करण्यात आलेला दिसत
नाही. (प्रतिनिधी)

यापूर्वी जर लांबचे मतदान केंद्र मिळाले तर शिक्षक आपापसात सामंजस्याने केंद्राची अदलाबदल करीत असत. मात्र यावेळी त्यालाही नकार देण्यात आल्याने महिलांची अडचण झाली आहे.
महिलांच्या बाबतीत हा नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. आम्हाला काम करायचेच आहे. मतदान केंद्रांवर काम करताना रात्री कितीही उशीर लागला तरी हरकत नाही, परंतु दहा ते बारा किलोमीटरच्या आतील मतदान केंद्र मिळावे, अशी मागणी शिक्षिका करीत आहेत. प्रशासनाने महिलांचे प्रश्न समजूत घेत यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

४बुथवरील अन्य सहकारी सोबत असतात मात्र, ते प्रत्येक वेळी सोबत असतीलच असे नाही. कारण यावेळी कोणाला कोणते केंद्र मिळणार आहे, याची काहीच शाश्वती नाही. मतदान केंद्रांवर वेळेत रिलीव्हर न मिळाल्याने महिलांना स्वच्छतागृहांमध्येही जात नाही. एखादी वाईट घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Difficulties in getting the long-distance polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.