डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व टिकून, लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:28 AM2018-12-26T01:28:04+5:302018-12-26T01:28:42+5:30

आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या डायऱ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

In the digital era, the importance of diary survival, millions of turnover | डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व टिकून, लाखोंची उलाढाल

डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व टिकून, लाखोंची उलाढाल

Next

पिंपरी : आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या डायऱ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या डाय-यांच्या माध्यमातून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व पर्यावरणाविषयी सामाजिक संदेशदेखील देण्यात आला आहे.
नवीन वर्ष काही दिवसांवर आल्यामुळे वर्षभराच्या नियोजनासाठी लागणाºया सन २०१९ च्या डायºया बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. आजच्या आधुनिक युगात संगणक, मोबाइल, टॅब, लॅपटॉप ही माहिती साठवण्यासाठी आधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र तरीदेखील अनेक कंपन्या, सरकारी व खासगी कार्यालये, उद्योजक, व्यापारी, लेखक, पत्रकार, शिक्षक आदी नागरिक आपल्या दैनंदिन नियोजन व व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी डायरीचा उपयोग करतात. त्यामुळे डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम आहे.
उपलब्ध डायºयांमध्ये आॅर्गनायजर डायरी, एक्झिक्युटिव्ह डायरी, प्लॅनर, नोटबुक, इंजिनिअरिंग डायरी, पॉकेट डायरी आदी प्रकारच्या डायºया आहेत. या डायºयांची किंमत १० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत आहे. अनेक कंपन्या आपल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी देखील डायºयांचा उपयोग करतात. त्यामुळे अनेक कंपन्या डायºयांची निर्मिती करतात. बाजारपेठेत डायºयांची लाखोंची उलाढाल पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत होत आहे.

नवीन वर्ष काही दिवसांवर आल्यामुळे अनेक कंपन्या, नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहार नोंदीसाठी डायरीचा उपयोग करीत असतात. त्यामुळे २०१९ या नवीन वर्षाच्या डायºयांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यंदाच्या वर्षी काही डायºयांमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असे सामाजिक संदेश व पर्यावरणाविषयी संदेशदेखील देण्यात आले आहेत. या डायºयांना नागरिक अधिक पसंती देत आहेत.
- विनोद अग्रवाल, विक्रेते

Web Title: In the digital era, the importance of diary survival, millions of turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.