प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:17 AM2018-07-24T01:17:19+5:302018-07-24T01:17:37+5:30

विद्यार्थ्यांनी केले भारुडाचे सादरीकरण, वेशभूषेने वेधले उपस्थितांचे लक्ष्य

Dindi giving a plastic bag | प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी

प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी

googlenewsNext

पिंपरी : हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी. टाळ-मृदंगाचा गजर म्हणजे वारी..भक्तीची कसोटी म्हणजे वारी... लोकरंगाची उधळण म्हणजे वारी. या वारीचे छोटेसे अनोखे रूप गणेशनगर थेरगाव येथील प्रज्ञा बालक मंदिर, विद्यामंदिर, माध्यमिक, द लिटिल टायगर कब्स प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये पाहायला मिळाले.
दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यानी विठ्ठल-रुक्मिणी, तसेच ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशभूषा करून आनंदाने अभंग, आरती, भारूड यांचे गायन केले. संस्थेच्या संचालिका भारती गवळी यांनी पालखीचे पूजन केले. रोहिणी वहिल व विद्यार्थ्यांनी पालखीस रांगोळी, गुलाल व फुलांनी पाय घड्या घालून दिंडीचे स्वागत केले. वारकरी यांनी माऊली माऊली या गाण्यावर ताल धरून रिंगण केले. विठ्ठल विठ्ठल म्हणत टाळ गजरामध्ये परिसर दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीला फाटा व कापडी पिशवीला मान म्हणून विद्यार्थ्याने हाताने तयार केलेल्या ३०० कापडी पिशव्यांचे वाटप परिसरातील नागरिकांना व पालकांना विठ्ठल रूक्मिणीच्या हस्ते करण्यात आले. दिंडीमध्ये पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले. विदयार्थ्यांना रिंगण करण्यास मार्गदर्शन राजेश्र्वरी होनमाने व शीतल गौंड यांनी केले. शाळेतील शिक्षिकांनी फुगड्या खेळून आनंद घेतला. पालखीचे छोटेसे रूप विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षिकांनी अतिशय उत्सुकतेने व आनंदाने पार पाडले.
शहर परिसरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. बालवारकऱ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीमध्ये पालक व नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सामाजिक संघटनांनी फराळ वाटप केले.

Web Title: Dindi giving a plastic bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.