बापरे! हॉटेलमधील जेवणाची थाळी पडली दोन लाखाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 08:25 IST2022-09-28T08:23:42+5:302022-09-28T08:25:13+5:30
अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल...

बापरे! हॉटेलमधील जेवणाची थाळी पडली दोन लाखाला
पिंपरी : आपण हॉटेलमधून बोलत आहे. जेवणावर ऑफर असल्याची सांगत व्हॉटअसपवर लिंक पाठवून क्रेडीट कार्डमधील दोन लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार चऱ्होली येथे २९ ऑगस्टला घ़डली. या प्रकरणी धीरद कुमार जैन (वय ४२, रा.चऱ्होली बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फोनद्वारे संपर्क साधत सुकांता या हॉटेलधून बोलत असल्याचे सांगितले. जेवणावर ऑफर असल्याचे सांगत आरोपीने फिर्यादीच्या व्हॉटअप क्रमांकावर लिंक पाठवली.
फिर्यादीने कोणताही ओटीपी अथवा पासवर्ड न देता या लिंकद्वारे फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधून दोन लाख तीन हजार ९५ रुपये परस्पर काढून घेण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे.