विरोधी पक्षनेता अन् सभापतीची थेट लढत
By admin | Published: February 17, 2017 04:59 AM2017-02-17T04:59:02+5:302017-02-17T04:59:02+5:30
प्रभाग क्रमांक २१ मधून ‘ड’ जागेसाठी विद्यमान स्थायी समिती सभापती आणि माजी विरोधी पक्षनेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
पिंपरी : प्रभाग क्रमांक २१ मधून ‘ड’ जागेसाठी विद्यमान स्थायी समिती सभापती आणि माजी विरोधी पक्षनेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यासह ‘ब’ प्रभागातून विद्यमान उपमहापौर, तर ‘क’ जागेसाठी राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षांची पत्नी रिंगणात आहे.
‘ब’ जागेसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान उपमहापौर प्रभाकर वाघेरे, भाजपाकडून संदीप वाघेरे, शिवसेनेकडून राजाराम कुदळे, तर काँगे्रसचे महादेव वाळुंजकर रिंगणात आहेत. येथे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे.
‘ड’ जागेसाठी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे विद्यमान सभापती हिरानंद आसवानी, शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, भाजपाकडून धनराज आसवानी, काँगे्रसकडून अजय खराडे रिंगणात आहेत. यासह मनसेचे राजू भालेराव, बहुजन समाज पार्टीचे राहुल वडमारे. येथेही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर ‘अ’ जागेसाठी राष्ट्रवादीचे निकिता कदम, भाजपाच्या मोनिका निकाळजे, शिवसेनेच्या उषा साळवे, काँगे्रसच्या मंजू जिरगे आदी रिंगणात आहेत. ‘क’ जागेतून राष्ट्रवादी कॉँगे्रस शहराध्यक्षांची पत्नी व विद्यमान नगरसेविका उषा वाघेरे या राष्ट्रवादीकडून असून, ज्योतिका मलकानी भाजपाकडून, तर हर्षा बुुलानी शिवसेनेकडून रिंगणात
आहेत. यासह विद्यमान नगरसेविका सुनीता वाघेरे या अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.(प्रतिनिधी)